खारीगाव : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त ठाणे खारेगाव कळवा येथे पुरातण श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार दिनांक ,१७ जुलै २०२४ रोजी आयोजित सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला . यानिमित्त भाविकांनी विठ्ठल नामाच्या गजरात आपल्या लाडक्या विठू रायाचे दर्शन घेतले

. एकादशी निमित्त आज विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुखमाई यांच्या मूर्तीस महाअभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले .यानिमित्त विठ्ठल रखुमाई मूर्तीना रेशीम वस्त्र अलंकार घालून सजविण्यात आले मंदिरासह परिसरात आकर्षक आरास केली हाेती. एकादशीच्या या सोहळ्यास दिवसभर निरनिराळ्या भजनी मंडळांनी भजने, कीर्तन , हरिपाठ असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले . भजनी मंडळाच्या वारकरी मंडळींच्या टाळ मृदूगांच्या तालावर पाऊली खेळण्याचा आनंद वारकऱ्यांसह भाविकांनी घेतला .
. बुधवार रोजी सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या . आषाढी एकादशी निमित्त हार , फुले , नारळ , पूजेचे साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती . कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . मंदिर ट्रस्टतर्फे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला .आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळ राजगिरा लाडू वाटप करण्यात आले
.



श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची द्विशतकाकडे वाटचाल सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा – द्विशतकाकडे वाटचाल करीत असलेल्या या मंदिराची (180 वर्षाची) परंपरा समस्त ग्रामस्थांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे या मंदिराचा जीर्णोद्धार 2003 मध्ये करण्यात आला आहे . त्यात मोलाची कामगिरी कै . पांडुरंग बुबेरा यांची आहे त्यात त्यांना समस्त संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आता ती धुरा संस्थेचे अध्यक्ष राजू मढवी , सचिव योगेश बुबेरा हे सांभाळत आहे. सदर मंदिरातर्फे दरवर्षी अनेक सामाजिक, शैक्षणिक , कार्यक्रम राबवले जातात यात रक्तदान शिबिर , आरोग्य शिबिर , गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो तसेच शिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह केला जातो
ही परंपरा गेली वीस वर्षे अखंडित चालू आहे .सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष राजू मढवी, सचिव योगेश बुवेरा, उपाध्यक्ष सज्जन बुबेरा , रमेश पाटील , तसेच विठोबा देवस्थान खारीगाव संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . यशस्वितेसाठी मंदिर ट्रस्ट व आयोजकांनी अथक परिश्रम घेतले .


