देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर ! विठु नामाच्या गजरात विविध मंदिरात आषाढी एकादशी साजरी :भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ :

भुसावळ/मेहूण : आषाढी एकादशी निमित्त भुसावळसह मेहूण येथिल श्री क्षेत्र मुक्ताई मंदिरात विठु नामाचा गजर करित भाविकांनी लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतले.
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली.
तसेच व्ही.एम.वाॅर्ड येथिल विठ्ठल मंदिरातही विद्युतरोषणाईसह आकर्षक आरास करण्यात आली होती यानिमित्त पहाटे विठ्ठल रखुमाईस महाअभिषेक करण्यात येऊन पोशाख व सोन्या चांदीचे आभूषणे घालून सजविण्यात आली होती . संपूर्ण दिवसभर भाविक भक्तासह जनसमुदाय दर्शनासाठी उसळला होता .
श्री क्षेत्र मेहूण
येथेही जिल्हाभरातील भाविकांनी श्री संत मुक्ताईंचे दर्शन घेतले.