हिंदू समाजाला हिसंक म्हणणं दुर्दैवी – शिशिर डी जावळे. राहुल गांधींनी हिंदूची नाक घासून माफी मागावी

भुसावळ — सध्या दिल्ली येथे संसदेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या अधिवेशना दरम्यान लोकसभेचे सभागृहाचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी संपुर्ण भारतीय जनता पार्टी हिंदू नाही , हिंदू हिंसाचारी नसतो असे वक्तव्य करून नवीन वाद निर्माण केला आहे.

सत्ता स्थापनेनंतर प्रथमच संसदेचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाचे काँग्रेसचे नेता खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय जनता पार्टी हिंदू नाही , हिंदू हिंसाचारी नसतो . अस म्हटल. भारतीय जनता पार्टीचे करोडो सदस्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नेत्यांचा हा घोर अपमान आहे.असं हिंदू धर्मविरोधी जातीय तेढ निर्माण करणार असून समस्त हिंदूंचा सनातन धर्माचा हा फार फार मोठा अपमान केलेला आहे. असा आरोप शिशिर जावळे यांनी केलेला आहे. लोकसभेत सभागृहात त्यांनी नियमबाह्यम भगवान शिवाचा फोटो ,शिवलिंग त्रिशूल यासह काही देवि देवतांचे गुरूंचे फोटो,चिन्ह साहित्य सभा गृहामध्ये भाषणदरम्यान दाखवलं याबाबत लोकसभेचे आदरणीय सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार त्यांना देवी देवतांचे फोटो यांचा वापर करू नका त्याचा सन्मान करा ,सभागृहात संसदेचे सदस्यांना अशा प्रकारचे फोटो, झेंडे किंवा एखादी खूण दाखवण याची परवानगी नाही हे सेक्शन 349 अन्वये नियमबाह्य असल्याच त्यांना सांगितल. मात्र राहुल गांधी यांनी अशा प्रकारे सभागृहामध्ये समस्त हिंदू धर्मियांचा सनातन धर्माचा गोरा अपमान केलेला आहे देवी देवतांचा प्रतिमा साहित्य याचा सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे. त्यामुळे अपमान भारतीय जनता पार्टी आणिआम्ही सर्व हिन्दू सहन करणार नाही . राहुल गांधींचं हे वक्तव्य हिंदू विरोधी आहे ,राहुल गांधींनी संपूर्ण सनातन धर्माची हिंदूंची त्वरित नाक घासून माफी जाहीर मागावी अन्यथा या विरुद्ध व्यापक स्वरूपात आंदोलन केले जाईल असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेले आहे.