भुसावळ- येथील पु. ओं. नाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्रा.डाॅ. ए.डी. गोस्वामी आणि राज्यशास्त्र विभागातील प्रा.डॉ. डी.एम. टेकाडे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव. विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा उपस्थित होते. त्यांच्या समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. ब-हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा . वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सुरवातीला पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयाच्यावतीने अध्यक्षांच्या हस्ते सेवापूर्ती करणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.ए.डी.गोस्वामी आणि प्रा.डॉ.डी.
एम. टेकाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. ए.डी. गोस्वामी यांचा तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. डॉ.डी. एम. टेकाडे तसेच माझी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी, स्टाफ क्रेडिट सोसायटी, एन. मुक्टो स्थानिक संघटनेच्या वतीने सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्रा.डाॅ. ए.डी.गोस्वामी यांच्या सेवापुर्ती निमित्त प्रा.डॉ. एस.टी.धुम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गोस्वामी सरांच्या कारकिर्दी वरती प्रकाश टाकला. त्यात त्यांनी गोस्वामी सर हे मनमिळावू व कार्य तत्पर असे व्यक्तिमत्व असून विभागाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन केले. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रा.डाॅ.आर एस नाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना प्रा.डाॅ. डी.एम.टेकाडे सर हे विद्यार्थी प्रिय व कर्तव्यदक्ष प्राध्यापक होते असे सांगितले. प्रा. व्ही.डी. पाटील यांनी गोस्वामी सर यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. तर प्रा.ई.जी.नेहेते यांनी गोस्वामी सर व टेकाडे सर यांच्या विद्यापीठातील कार्यावर तसेच प्राध्यापक संघटनेतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राचार्य एस.व्ही.पाटील यांनी असे प्रतिपादन केले की, प्रा. डॉ. ए.डी. गोस्वामी हे१९९० पासून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले. ते शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. सरांनी १२ वर्षे एन.एस.एस. मध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, मुख्य कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यापीठ जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले. सरांच्याच काळात महाविद्यालयातील एन. एस.एस. युनिटला विद्यापीठाकडून बेस्ट एन.एस.एस.युनिट हा पुरस्कार मिळाला आहे आणि सरांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला. सर
महाविद्यलयाच्या विविध समित्यांवर सदस्य व प्रमुख म्हणून कार्यरत होते. प्राध्यापक डॉ. ए.डी.गोस्वामी यांनी महाविद्यालयाच्या विविध समित्यांवर सदस्य व समिती प्रमुख म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठात बँकिंग बोर्डाचे ते चेअरमन होते. विद्यापीठातील अकॅडमी काउंसिल सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. तसेच सन 2000 ते 2005 या कालावधीत ते विद्यापीठात आधी सभा सदस्य म्हणून निवडून आलेले होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत काम केलेले आहे त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारी मंडळावरही ते सदस्य म्हणून सदस्य म्हणून निवडून आलेले होते. महाविद्यालयात 2017 पासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी उपप्राचार्य पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली होती. महाविद्यालयातील दुसरे जेष्ठ प्राध्यापक मा. प्रा. डॉ. डी. एम. टेकाडे हे सुद्धा आज सेवानिवृत्त होत आहेत. ते एक शांत, संयमी आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. आपल्या सेवाकाळात त्यांनी अध्यापन कार्याबरोबरच सामाजिक शास्त्र मंडळ, संशोधन समिती, कला मंडळ, सामान्य ज्ञान मंडळ, नॅक समिती , आदी ठिकाणी सदस्य व चेअरमन म्हणून काम पाहिले. ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात असे सांगून त्यांच्या सेवापूर्ती नंतरचे आयुष्य निरोगी निरामय समृद्ध जावो हीच सर्वांतर्फे प्रार्थना केली.
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा.डाॅ.ए.डी.गोस्वामी यांनी असे सांगितले की, माझ्या जीवनात माझ्या आईमुळेच मी इथपर्यंत यशस्वी प्रवास केला व आई बरोबरच माझ्या गुरुजनांमुळे मी घडलो. माझ्या जीवनात संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक यांनी अनमोल सहकार्य करून उपप्राचार्य पदाची धुरा माझ्या हाती दिली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. दुसरे सत्कारमूर्ती प्रा.डी.एम.टेकाडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना असे म्हटले की, माझ्या जीवनात संस्थेचे माजी दिवंगत अध्यक्ष स्व. नानासाहेब फालक यांनी मला अनमोल सहकार्य केले त्यातूनच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ फालक यांनी दोन्ही सेवापुर्ती करणा-या प्राध्यापकांना निरोगी व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण वारके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. व्ही.ए.सोळुंके यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, माजी प्राध्यापक तसेच गोस्वामी सरांचे पी.एच.डी चे संशोधक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



