भुसावळात बालिकेची छेड ; बाल लैगिंक कायद्यासह ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल ; आरोपीस अटक :


भुसावळ – तालुक्यातील साक्री फाटा येथील सेन्टपॉल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिकणाऱ्या नर्सरीतील साडे तीन वर्षाच्या बलिकेसोबत मारुती व्हॅन चालक याने शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलं असून याप्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला बाल लैंगिक कायद्या सह ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती अशी की दिनांक ता.१ ते २ जुलै रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान स्कुल बस मारुती व्हॅन क्रमांक (एम.एच.१९.अ.ई.०२७९) मध्ये ड्रायव्हर प्रसाद हिरामण चौधरी राहणार साकरी याने सेन्टपॉल इंग्लिश मिडीयम स्कुल साक्री फाटा भुसावळ या शाळेच्या बाहेर मारुती व्हॅन मध्ये ड्रायव्हर शीट शेजारी बलिकेला बसवून तिला मानसिक व शारीरिक त्रास होईल असे कृत्य केले . म्हणून संशयित आरोपी प्रसाद हिरामण चौधरी यांचे विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीन कायद्या अंतर्गत हा पहिलाच गुन्हा गुरन २४४/२०२४ भा.द.वि.कलम ६४,६५(२) ३,४,५,६,३(१)(w)(i),३(१)(w)(ii) प्रमाणे दिनांक ४/७/२०२४ रोजी बाल लैंगिक कायद्या सह ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .