जळगांव :- येथिल अजिंठा हौसिंग सोसायटी मधील बुद्ध विहारात दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व तर्फे आणि जळगाव तालुका शाखेच्या वतीने दहा दिवसिय बौध्दाचार्य /श्रामणेर शिबिराचे उद्घाटन दिनांक 1 जून रोजी सायंकाळी ५. वाजता आद.रविंद्र वानखेडे अध्यक्ष जिल्हा शाखा जळगाव पूर्व यांचे हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेश नामदेव इंगळे अध्यक्ष तालुका शाखा जळगाव हे होते…,
या शिबिरात एकुण २५ शिबिरार्थीनी सहभाग घेतला असुन या शिबिरार्थीना भदंत दिपंकर महाथेरो चैत्यभूमी, दादर मुंबई यांनी श्रामणेर दिक्षा दिली तसेच या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक के.वाय.सुरवाडे केंद्रीय शिक्षक हे आहे.
सतत दहा दिवस चालणाऱ्या या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरामध्ये विवाह संस्कार विधी , धम्मदीक्षा विधी , नामकरण विधी , साक्षगंध विधी , मुर्ती प्रतिष्ठापना विधी , गृह प्रवेश विधी इत्यादी १३ प्रकारच्या विधिचे महत्व व प्रात्यक्षिक शिकवले जाईल सोबतच निर्वाण – परिनिर्वाण – महापरिनिर्वाण भगवान बुध्द चरित्र व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र , संस्थेची रचना व कार्य पध्दती /अंधश्रध्दा एक सामाजिक समस्या इत्यादी विविध ४५ विषयाची माहिती देण्यात येणार आहे . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिलकुमार हिवाळे जिल्हा सरचिटणिस जळगाव पूर्व यांनी केले.
सदर या प्रसंगी जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष बी.एस.पवार गुरूजी /सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा हिशोब तपासणीस जळगाव पूर्व /आद.वसंतदादा लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन विभाग/आद.सुभाष सपकाळे कार्यालयीन सचिव/आद,प्रा,प्रितलाल पवार, जिल्हा संस्कार सचिव.युवराज नरवाडे पर्यटन विभाग सचिव,/आनंदमित्र सपकाळे संस्कार उपाध्यक्ष भुसावळ तालुका, संघटक जामनेर तालुका.,भिमराव पवार जिल्हा संघटक,सुषमाताई इंगळे ,यशवंत तथा सुपडू जाधव,सागर सदावर्ते,अॕड.सुनिल सोनवणे,श्रीकृष्ण सदावर्ते,दिलीप डोंगरे इत्यादी उपस्थिती होती.

या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या यशस्वीतेसाठी जळगाव तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाचे सैनिक तसेच दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा विविध पदाधिकारी प्रत्यक्ष सहकार्य केले. आभार जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले.



