जळगाव : मुंबई-जळगाव अशी विमान सेवा भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदील शुक्रवारी मिळाला असून अंतीम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. या महिन्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

तासाभरात गाठता येईल मुंबई
विविध कामानिमित्त जळगावातून मुंबईला जाणार्यांची संख्या मोठी आहे मात्र ट्रॅव्हल्स वा रेल्वेने त्यासाठी आठ तासांपेक्षा अधिक वेळ प्रवास करावा लागतो मात्र मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाल्यास तासाभरात मुंबई जाता येणार आहे.
व्यापार्यांसाठी सेवा फायदेशीर
जळगावातील व्यापारी वर्गाकडून मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मागणी केली जात होती. या मागणीनुसार अलायन्स विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव विमान सेवेला मान्यता मिळाली असून जून महिन्यात ही विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापार्यांना या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे.
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ’अलायन्स एअर’ या विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून मुंबईची विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी व्यापार व उद्योग वाढीच्या दुष्टीकोनातून आनंदाची बाब आहे.


