भुसावळ – येथील साकेगव पुला जवळ एका सुसाट बोलेरोने समोर येणाऱ्या गाडी चालकास जोरदार धक्का दिल्याने जखमी झालेले दोघाना त्वरित उपचारार्थ भुसावळ येथील ट्रमा सेंटर मध्ये दाखल करून मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद सार्थ केले .

येथील साकेगावच्या पुलानजीक सुसाट धावणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जळगावच्या दोन प्रवाश्याना जोरदार धडक तेथून पळ काढला . जोरदार धडक लागल्याने दोघे जण रस्त्याच्या कडेला पडले होते त्यांच्या भोवती बरेच माणसाच्या गर्दी दिसत होती . हे दृश्य आपले खाजगी काम आटोपुन परत येणाऱ्या भुसावळघ्या गोसेवकांना दिसले त्यांनी त्याठिकाणी जाऊन विचारपुस केली जखमीचें नाव सुरज साळुंखे व राजु पिंजारी असे आहे
त्यांना त्वरित त्यांना शहरातील ट्रामा सेंटरमध्ये नेले डॉक्टरांनी त्यांचेवर उपचार केल्याने जखमीना बरे वाटु लागले त्यांच्या नातेवाईकांना कळविले
त्यांनी शहरातील गोसेवक रोहित महाले बल्लु धायडे व समस्त गोभक्तांचे आभार मानले यावेळी अपघात करणाऱ्या व वेगवान धावणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे


