मध्य रेल्वे मुंबई-बालेश्वर आणि पुणे- बालेश्वर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे

उन्हाळी हंगामात अतिरिक्त गाड्यांच्या प्रवाशांच्या गरजेला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते बालेश्वर आणि पुणे ते बालेश्वर दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1) मुंबई – बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी ( 2 फेरी )
01055 सुपरफास्ट विशेष दिनांक 18.05.2024 (शनिवार) रोजी 11.05 वाजता मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.15 वाजता बालेश्वर येथे पोहोचेल.
01056 सुपरफास्ट विशेष दिनांक 20.05.2024 (सोमवार) रोजी 09.30 वाजता बालेश्वर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 22.50 वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर
रचना: एक AC-फर्स्ट, एक AC-फर्स्ट कम AC-2Tier, चार AC-3Tier, 7 स्लीपर क्लास, 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 9 सामान्य द्वितीय श्रेणी (22 ICF कोच)
2) पुणे – बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी ( 2 फेरी )
01451 विशेष दिनांक 18.05.2024 (शनिवार) रोजी 11.30 वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.30 वाजता बालेश्वर येथे पोहोचेल.
01452 विशेष दिनांक 20.05.2024 (सोमवार) रोजी 09.00 वाजता बालेश्वरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.30 वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव , मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर
रचना ;- दोन AC-3Tier ,18 स्लीपर क्लास, 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


