भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी भुसावळ स्पोर्ट्स अॅधण्ड रनर्स असोसिएशन आयोजित ‘बी सारा लेडीज इक्वालिटी रन’ च्या महिला जागतिक महिला दिनी धावणार आहे .
स्पर्धेसाठी 8 मार्च रोजी सकाळी ठिक 05.45 च्या आत स्पर्धकांनी शहरातील ‘कोरोनेशन क्लब’ (डी.एस.हायस्कूलच्या शेजारी) दाखल होणे आवश्यक आहे त्यानंतर वॉर्म अप व झुम्बा डान्सचे आयोजन होईल. त्यानंतर ठीक सकाळी 6.30 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. धावक क्रमांक असल्याशिवाय कोणासही स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही, असे भुसावळ रनर्सचे प्रा. प्रवीण फालक यांनी कळविले आहे. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आयोजकांतर्फे प्रत्येक स्पर्धकासाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे.
स्पर्धे दरम्यान शिस्त आणि स्वच्छता राखावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



