महिला रेल्वे कर्मचारी हॉकीपटू प्रीती दुबे यांचा डीआरएम यांचे हस्ते सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी )-
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित सप्ताह कार्यक्रमात शनिवार ७ रोजी भुसावळ रेल्वे विभाग येथे महिला रेल्वे कर्मचारी प्रीती दुबे यांचा सन्मान करण्यात आला. त्या भुसावळ येथील झेड आर टी आय मधे प्रशिक्षण घेत असून मुंबई येथे कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन डी गांगुर्डे सिनि डी पी ओ यां नी केले त्यात त्यांनी प्रीती दुबे यांचा परिचय करून दिला आणि रेल्वे तर्फे महिला खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधां बाबत माहिती सांगितली. दास प्राचार्य झेड आर टी आय यांनी महिला शक्तीचा इतिहास आणि परंपरा आणि महत्त्व विशद केले. प्रीति दुबे यानी २०१० पासुन हॉकी खेळण्यास सुरुवात केली. ग्वालियर येथे त्यांनी तीन वर्ष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतीय रेल्वे टीम मध्ये निवड झाली.त्यानंतर ज्युनियर आशिया कप खेळात सुवर्ण पदक प्राप्त झाले. साऊथ एशियन गेम्स तसेच 2016 मध्ये रिओ ओलंपिक मधे भारतीय हॉकी टीम मध्ये सहभाग घेतला. 2018 पासून रेल्वे मध्ये कार्यरत आहेत. विवेक कुमार गुप्ता डी आर एम यांच्या हस्ते प्रीती दुबे यांना मानपत्र, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले प्रीती यांचे विशेष अभिनंदन भारताचे प्रतनिधीत्व त्यांनी हॉकी मध्ये केले आणि आता रेल्वे परिवाराच्या त्या सदस्य झाल्या. रेल्वे प्रशसनाकडून नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते, आपल्या कडून आपल्या देशासाठी आणि भारतीय रेल्वे साठी भरीव कामगिरी होवो या साठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रीती दुबे म्हणाल्या एका विशिष्ठ वयापर्यंत खेळाडू खेळू शकतो पण नंतर त्याला पाठबळाची आवश्यकता असते. भारतीय रेल्वे ते मला दिले आणि निश्चिंतपणे आता माझ्या खेळावर मी लक्ष केंद्रित करू शकते. आपण मला सन्मान दिला त्या बद्दल मी आभारी आहे आणि माझ्याकडून देशाचे आणि भारतीय रेल्वेचे नाव उंचाविण्या साठी मी सदैव तत्पर राहील असे सांगितले. प्रीती दुबे हिला सन्मानीत करतांना डीआरएम विवेक कुमार गुप्ता सोबत आर एच परदेशी एपीओ, सतीश कुलकर्णी ,प्राचार्य रेल्वे स्कूल,एस के दास , प्राचार्य झेड आर टी आय,एन डी गांगुर्डे, सिनि डी पी ओ, रामचंद्रन सिनि डी ई एन मुख्यालय, एम के गायकवाड डी पी ओ,यांचेसह
मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी
आणि कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन आर एच परदेशी एपीओ यांनी केले तर सूत्र संचालन दीपा स्वामी वरिष्ठ कल्याण निरीक्षक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *