भुसावळ (प्रतिनिधी )- 8 मार्च हा जागतिक महिला दिन निमित्त कार्यक्रम
दिनांक ८ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ४.वा. नगरपालिका शाळा क्रमांक ०१, श्री नगर, जळगाव रोड, भुसावळ येथे जागतिक महिला दिन निमित्त बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेला पॉक्सो कायदा मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना समुपदेशन तसेच मुली व महिलासांठी आयोजित करण्यात आले आहे.
सोबतच महिलांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केले जाणार असून या कार्यक्रमात महिला लाभार्थीसाठी मुद्रा लोन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत रोजगार नोंदणी या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
परिसरातील आजी माजी सैनिक माता, पत्नी, शेतकरी, कामगार, डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, जेष्ठ महिलांचा व होतकरू व कर्तृत्ववान महिलांसोबत सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात महिला सशक्तीकरण व सबलीकरण यासाठी काम करून नावलौकिक मिळविलेल्या महिलांना, आजी माजी सैनिक पत्नी, तसेच वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या महिलांना गौरवण्यात येणार आहे.
परिसरातील महिलांनी उपक्रमात सहभागी नोंदवावा असे आयोजन समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.



