भुसावळ – आजच्या धावपळीच्या जिवनात लहान मुलांवर अभ्यासा व्यतिरिक्त आघुनिकतेकडे वाटचाल करतांना सुसंस्कार व्हावेत , त्यांनी मोबाईलचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नये , बौध्दिकविकासा बरोबरच मुलांचा शारिरीक विकास व्हावा या उद्देशाने येथील महिला पतंजली योग समितीतर्फे १० दिवशीय बाल संस्कार शिबिर सुरू करण्यात आले आहे .
स्थानिक पुंडलिक ब-हाटे हायस्कूल येथे दिपक महाराज आयोजित सुसंस्कार शिबिरात सुमारे दीडशे मुलांचा सहभाग आहे शिबिरामध्ये मुलांना महिला पतंजली योग समिती भुसावळ राज्य कार्यकारिणी सदस्य महानंदा पाटील योगशिक्षिका ,अंजली वाघमारे वर्षा लोखंडे मनीषा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत असून सकाळी सहा ते साडेसात दरम्यान मुलांना योग प्राणायाम , सुर्यनमस्कार , जॉगिंग आसन व विविध मैदानी खेळातून योगाभ्यासाचे प्रशिक्षण मिळत आहे शिबिरास मुलांचा खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
रोज त्यांना नवनवीन शिकायची उत्सुकता असते .शिबीर यशस्वीतेसाठी सर्व आयोजन दीपक महाराज व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभत असून मोलाचे सहकार्य पुंडलिक ब-हाटे मराठी शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यांचे आहे





