प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा पुणे ते अयोध्या कॅट विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:
ट्रेन क्र. ०१४५५ पुणे ते अयोध्या कॅट द्वि -साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०५.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०१४५६ अयोध्या कॅट ते पुणे द्वि -साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०२.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



