भुसावळातील महाविद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग –

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील एका महाविद्यालयात एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी 2.10 वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात ईलियास शेख नुरूद्दीन (25, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
19 वर्षीय पिडीता एका गावाहून शिक्षणासाठी महाविद्यालयात शिक्षण घेते. सोमवारी दुपारी 2.10 वाजता पीडीता महाविद्यालयात असताना आरोपी ईलियास याने विद्यार्थिनी पाहून गाणे म्हटले व पाण्याची बाटली मागितली असता, ती न दिल्याने संशयीत ईलियास याने विद्यार्थीनीचा हात धरून ओढले. महाविद्यालय आवारात झालेल्या या प्रकारामुळे प्राचार्यासह अन्य प्राध्यापक सुध्दा घटनास्थळी धावून आले. आरोपी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून तो पेपर देण्यासाठी महाविद्यालयात आल्याचे सांगण्यात आले.

पीडीत विद्यार्थीनीने येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात ईलियास शेख नुरूद्दीन याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोपान पाटील करीत आहे.