भुसावळ येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ईव्हीएम सिलिंग सेटिंगची प्रक्रिया सुरु…

भुसावळ –

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 12- भुसावळ विधानसभा मतदारसंघ करिता शासकीय धान्य गोदाम क्र.2 भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील स्ट्रॉंग रूम मध्ये ई व्ही एम मशीन मधील सीलिंग वं सेटिंगच्या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झाली.आज दिनांक 07/05/2024 पासून कार्यवाही सुरु झाली. संबंधित कंपनीचे इंजिनियर तसेच मास्टर ट्रेनर यांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली वं नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक व अचूकपणे पूर्ण केली.

एकूण 316 पैकी 240 मशीन सिलिंग करून सज्ज झाल्या. त्याकरिता एकूण 20 टेबलवर प्रत्येकी 6 कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 8:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत सदरील सिलिंगची कामे सुरु होती.
उर्वरित मशीनची सिलिंग सेटिंगची कामे उद्या पूर्ण करण्यात येणार आहे असे कळविले आहे.
4-रावेर लोकसभा मतदारसंघा करिता जनरल निवडणूक निरीक्षक अशोक कुमार मीना यांची विशेष उपस्थिती होती.12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे , यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.