–

भुसावळ : लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांना उमदेवारी जाहीर केली आहे. संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा बुधवार, 3 मे रोजी भुसावळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (पूर्वीचे डी एस ग्राउंड) येथे सकाळी 11 वाजता होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भुसावळ शहरात पहिलीच जाहीर सभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांची होत आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने भुसावळ शहरात सभा घेतलेली नाही. सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे.


