भुसावळात श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन :

भुसावळ – भुसावळ शहरात प्रभू राम नवमी निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमित्त सांयकाळी ६ वाजता सवाद्य मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे .

*साईबाबा मंदिर संस्थान व साईबाबा गृपतर्फे भव्य पालखी सोहळा*

– शहरातील साईबाबा मंदिर व साईबाबा गृपतर्फे श्रीराम नवमी निमित्त दिनांक १७ रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . पालखी जामनेर रोड मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन , बस स्टँड , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अप्सरा चौक , या चौक या प्रमुख मार्गावरून सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात येणार आहे . तसेच समारोप श्री साईबाबा मंदिर येथे होणार आहे . तरी या पालखी सोहळ्यास सर्व श्रीराम भक्त , साईभक्त , व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थेच्या व साईबाबा गृपच्यावतीने करण्यात आले आहे .

जय श्रीराम गृपतर्फे भव्य मिरवणूक :

शहरातील जय श्रीराम गृप, राम मंदिर वार्ड , विठ्ठल मंदिर वार्ड, यांच्यावतीने प्रभू श्रीराम नवमी निमित्त बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री प्रभू रामचंद्र मंदिरापासून बाजारपेठ पोलीस स्टेशन नृसिंह मंदिर , जवाहर डेअरी ,अप्सरा चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार असून पुन्हा राम मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जय श्रीराम गृपचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे उपाध्यक्ष अमोल सोनार ,खजिनदार सौरभ बनसोडे, पवन शिंदे ,अजय पाटील, गोलू कापडे, पवन फालक, नवजीत चौधरी , प्रशांत वैष्णव ,चैतन अंबोले ,योगेश महाजन यांच्यासह जय श्रीराम गृपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.