भुसावळ – येथे जनजाती वनवासी बांधवांचा अभिमान असणारी जगप्रसिद्ध चित्रकला वारली पेंटिंगची सर्वाना ओळख व्हावी यासाठी देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ तर्फे चित्रकला प्रेमींना साठी वारली चित्रकला कार्यशाळेचे दिनांक 21 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे . येथील परीक्षित ब-हाटे यांची गणपत ब-हाटे या शाळेत सकाळी १० ते १ दरम्यान आयोजित या कार्यशाळेत प्रसिद्ध चित्रकला तज्ञ नयनाताई काचुरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे याकरीता या कार्यशाळेत आपल्यासह पाल्यांना जरूर या संधीचा फायदा घेऊ द्या. वारली चित्रकला सोपी आणि अत्यंत आकर्षक आहे . हातरूमाल, साडी किनार, बेड शीट, उशी अभरे, लहान बाळाचे झबले, कुर्ता यासह अनेक कपड्यावर कुंडी फ्लॉवर पॉट आदींवर वारली डिझाइन रेखाटली जाते या कार्यशाळेत आपल्या हाताने केलेल्या चित्राचा व देखणेपणाचा आनंद घेता येईल याकरिता नोंदणी शुल्क 100 रुपये आहे सहभागी स्पर्धकाला ब्रश नंबर 1 राउंड, व ब्रश नंबर 5,असे कलर, ब्रश.. माऊंट बोर्ड 1 कागद व रंगासह साहित्य दिले जाईल स्पर्धकांने सोबत पाणी बॉटल , ग्लास , व नॅपकिन आणावे , काढलेले चित्र घरी नेता येईल . आपली कला दाखवणेची उत्तम संधी असून या संधीचा फायदा महिलांसह मुलामुलींनी अवश्य घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . स्पर्धेत प्रत्यक्ष नोंदणी करीता पुढील भ्रमणध्वनीवर 19 एप्रिल पर्यंत संपर्क साधावा ऍंडव्होकेट जास्वंदी भंडारी (8624878299 ), ऍंडव्होकेट चित्रा आचार्य (7588350682 ) , ऍंडव्होकेट जयश्री देशमुख 8087512893, कांशीराम बारेला सर (7709516373 ) .



