भुसावळ : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण भुसावळ शहर भीममय झाले आहे. महामानवाच्या जयंतीनिमित्त शहरात मोठा उत्साह असून जयंती उत्सव समितीने संपूर्ण शहरात अडीच हजाराहून अधिक झेंडे लावले आहेत तर 70 फुटांचे चार मोठे झेंडे डौलात फडकत असून ते येणार्या-जाणार्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरही रोशनाईने उजळला आहे तर अन्य भागातही मोठ्या प्रमाणावर रोशनाई करण्यात आली आहे.

शहरात ध्वजाला वाढली मागणी
शहरातील यावल रोड, जळगाव रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, हंबर्डीकर चौक पूलापर्यत, जामनेर रोड, बसस्थानक रोड, वरणगाव रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागात मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आले आहे. यामध्ये अशोक चक्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व अशोक चक्र असलेले, जयभीम नावाचे, फक्त अशोक चक्र असलेले झेंडे लावण्यात आले आहे. शहरातील विविध भागात हे झेंडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शहरात लहान झेंड्यापासून मोठ्या झेंड्यांचे दर 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जयंती उत्सव समितीतर्फे तीन दिवस विविध कार्यक्रम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भीम महोत्सवात रविवार, 28 एप्रिलला संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत राजरत्न आंबेडकर यांचे व्याख्यान होईल तर 29 एप्रिलला प्रबोधनात्मक कार्यक्रमात संविधान मनोरे यांचा कार्यक्रम संध्याकाळी 6 ते 10 या यवेळात होईल तसेच मंगळवार, 30 एप्रिलला सुध्दा याच वेळी प्रकाशनाथ पाटणकर यांचा कार्यक्रम होणार आहे.
उद्या निघणार दुचाकी रॅली
रविवार, 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली गांधी पुतळा, जळगाव रोडने मामाजी टॉकीज, दगडी पूलखालून जामनेर रोडने नहाटा चौफुली, सुंदर नगर, 15 बंगला, शिवाजीनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रRCVवVगछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बसस्थानक, बाजारपेठ पोलीस ठाणे, पूलाखालून हंबर्डीकर चौक, गांधी पुतळ्यावरून परत डॉ.आंबेडकर मैदानावर आल्यानंतर रॅलीचा समारोप होईल, असे समिती अध्यक्ष गणेश सपकाळे यांनी सांगितले.
जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
जयंतीचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रविवारी सकाळी आठ ते 12 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन विक्रांतसिंग राजपूत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणाले की, यंदा उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुष्यात चांगले काम करता आल्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.



