प्रा.डाॅ.कामिनी तिवारी लिखीत पुस्तकाचे विमोचन

भुसावळ (प्रतिनिधी )-
बोदवड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिन्दी विभागाच्या प्रा.डाॅ.कामिनी तिवारी यांनी लीहिलेल्या गझलकार चंद्रसेन विराट पुस्तकाचे विमोचन नुकतेच धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात पार पडलेल्या परिषदेत क.ब.चौ.ऊ.म.विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा.डाॅ.प्रमोद पवार, शितलाप्रसाद दुबे,प्रा.डाॅ.सुनिल कुलकर्णी, डाॅ.क्रुष्णा पोतदार,डाॅ.मधु खराटे आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर ग्रंथ हिन्दी साहित्यीक व अभ्यासकांसाठी उपयुक्त असुन चंद्रसेन विराटांच्या गझलांवर मौलीक प्रकाश टाकला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रा.डाॅ.तिवारी यांची आजतागायत ग्रंथ व पुस्तके प्रकाशीत झाली आहे.
संस्थाध्यक्ष मिठुलाल अग्रवाल,उपाध्यक्ष अजय जैन,सचिव विकास कोटेचा,सर्व संस्थाचालक,प्राचार्य डाॅ.अरविंद चौधरी,ब्रिजेश दुबे,प्रा.डाॅ.अर्पणा चंद्रास,शकुंतला पवारप्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *