भुसावळ ( प्रतिनिधी )-
नायक मंगेश जिवहर भगत याने कर्तव्यावर असतांना त्याची 10 इनसास 5.56 एम.एम. रायफल मधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आरपीडी पॉइंटवर घडली आहे. या घटनेमुळे मिल्ट्री परिसरात खळबळ उडाली आहे . शहरातील आरपीडी पॉइंटवर ड्यूटीवर असलेल्या गार्ड अंमलदार नायक भगत मंगेश जीनवार (वय ३२ रा. चिखली ता. बुलढाणा) या जवानाने स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्घटना आज बुधवार ४ रोजी सकाळी ११ . ०५ वाजे दरम्यान येथे घडली आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला असून त्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मुतदेह आणण्यात आला असून आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही
याबाबत नाईक कुदनसिंग भवरसिंग राठोड , टी.ए.बटालियन भुसावळ मिल्ट्री यांनी भुसावळ शहर पोलिसात खबर दीली की , भुसावळ येथे दि.13 फेबुवारी 2020 पासुन नेमणुकीस आहे. आज दि 4 मार्च रोजी सकाळी 6 ते सायकाळी 06. वाजे पावेतो मेस वाटर पंप भुसावळ येथे सेन्ट्री डयुटी होती. त्यामुळे सकाळी 06. वाजेला ड्युटीस आलो माझे सोबत ग्रेन्डीअर (शिपाई) जी.एफ एन.ए.आर.एम.भगराम ग्रिनीडीअर किशोर ए.पी. ,नायक , मंगेश जिनवर भगत असे डयुटीस होते.सकाळी 6 ते 8 मेनाराम 8 ते 10 वाजता के.पी.ची डयुटी होती 10 ते 12 माझी डयुटी होती नायक -मंगेश भगत हे गार्ड अंमलदार होते ते सुध्दा येथे हजर होते. त्यानी मला सांगीतले की, मी हजर आहे. मी डयुटी करतो तुम्ही आराम करा असे सांगीतल्याने मी गार्ड रूम मध्ये बसलो होतो. नायक मंगेश
भगत यांनी त्याची रायफल बट नं.10 इनसास 5.56 ही घेवुन 20 राऊड अॅम्युनेशन घेवुन ते पाहरा करीत होते.मी गार्ड रूम मध्ये बसलेलो असतांना 11.05 वा.रायफल मधुन गोळी फायर झाल्याचा मला जोरात आवाज आला त्यामुळे मी तात्काळ बाहेर येवुन पाहता नायक मंगेश भगत हे दरवाज्या समोर खुर्ची समोर खाली पडल्या अवस्थेत होते.त्याचे कपाळापासुन वर डोक्यास जखम होवुन रक्त निघत होते. राऊड फायर झाल्याचे खाली काडतुस व एक जिवंत राऊड बाजुला पडलेला दिसत होता. त्यावरून मंगेश भगत याने रायफल मधुन स्वतावर गोळी जाळुन आत्महत्या केल्याचे दिसुन आले म्हणुन मी आम्ही लागलीच बी.एच.एम. ऑफीसर यांना फोन करून घटना कळविली त्यावेळी मेनाराम व किशोर हे जेवनाचा डब्बा घेण्यास गेले होते. ते दोघेही लागलीच येथे आले नायक मंगेश जिवहर भगत याने कर्तव्यावर असतांना त्याची 10 इनसास 5.56 एम.एम. रायफल मधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यावरून अकस्मात मृत्यु नोंद करण्यात आली असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोबे व सहकारी यांनी त्वरीत धाव घेतली व पाहणी केली .तपास शहर पोलिस करीत आहे .



