फुलगाव येथील शासकीय तांत्रीक (टेक्नीकल ) विद्यालयातून घराकडे परतणार्या विद्यार्थ्याला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने त्याचा जागीच करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ .४० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर समोर घडली. या अपघातात रोहित सुनील इंगळे वय (17) हा विद्यार्थी जागीच ठार झाला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार रोहित हा आपल्या मित्रासह फुलगाव येथील शासकीय तांत्रीक ( टेक्नीकल ) विद्यालयातून दुचाकी क्रंमाक एम एच १९ डी जी ६३३९ वरुन वरणगावकडे येत असताना शिवाजी नगरजवळ पाठीमागून येणारी कार क्रंमाक एम एच १९ सी व्ही ०९९० भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीस्वारामागे बसलेला रोहित जमिनीवर पडला व डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. असून रोहीत सुनील इंगळे राहणार आंबेडकर नगर ,यांचे शिक्षण ऑयुध निर्माणी वरणगाव केंन्द्रीय विदयालयात पहीले ते दहावीपर्यंत इंग्लीश मिडीयन मध्ये झाले असून तो महात्मा गांधी विदयालय व कनिष्ठ महाविदयालय वरणगाव शाळेत ११ वी सायन्समध्ये शिक्षण घेता होता . रोहीत हा एकुणता एक हुशार मुलगा होता . या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


