भुसावळ- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुक्यातील मतदार केंद्रासाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण आणि ईव्हीएम हाताळणी शिबीराचे आयोजन पांडूरंग टॉकीज आणि म्यूनिसिपल हायस्कूल येथे रविवारी ७ एप्रिल रोजी सकाळी प्रशिक्षण संपन्न झाले . यावेळी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या १ हजार २९६ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील , व तहसीलदार नीता लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

१२ भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पांडुरंग टॉकिज भुसावळ येथे दोन सत्रात आज रोजी सकाळी 9 ते 11 व 12 ते 2 असे झाले आणि E.V.M हाताळणी साठी म्यूनिसिपल हायस्कूल जामनेर रोड शाळेत पहिले सत्र सकाळी ११ ते १ व दुसरे सत्र २ ते ४ या वेळेत पार पडले. प्रत्यक्ष E.V.M हाताळणी करून मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्या कडून प्रमाणपत्र सादर करून घेतले.सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान प्रक्रियेतील अडी अडचणी, पारदर्शक मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तहसीलदार नीता लबडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.अंगद असटकर नायब तहसीलदार यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले. सदर प्रशिक्षण करिता अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटेजळगाव यांनी भेट दिली.
दोन टप्प्यातं घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात मतदार संघातील एकूण 1211 कर्मचारी हजर होते. प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या 84 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.



