भुसावळ (प्रतिनिधी )-
शिक्षण विभाग भुसावळ यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण करता यावे त्याचप्रमाणे नावीन्याचा ध्यास घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते याच अंतर्गत तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन गुरुवारी दिनांक 5 मार्च रोजी संतोषीमाता बहुउद्देशीय सभागृहात दुपारी 2 वाजता करण्यात आले आहे यामध्ये तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील उत्कृष्ट पहिल्या तीन क्रमांकाचे नाटिका नृत्य यांचे सादरीकरण करून तालुक्यातील विद्यार्थ्यांची एकमेकांशी संवाद घडवून आणला जाणार आहे तसेच विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील करतील यावेळी उपसभापती वंदना उन्हाळे जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे, रवींद्र पाटील, सरला कोळी पंचायत समिती सदस्य सुनील महाजन, प्रीती पाटील, विजय सुरवाडे, आशा निसाळकर, गटविकास अधिकारी विलास भाटकर, संतोषीमाता को-ऑपरेटिव सोसायटीचे अध्यक्ष वासू इंगळे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान शिक्षण विस्ताराधिकारी रागिणी चव्हाण केंद्रप्रमुख नलिनी झांबरे, बी डी बोदडे, संजय श्रीखंडे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत



