भुसावळ ( प्रतिनिधी ) –
खून करून फरार झालेला संशयित आरोपी धिरज गणेश शिंदे हा दिनांक ३ मार्च २०२० रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनला स्वत: हजर होत पोलिसांना शरण आला .
शहरात जुना सातारा भागातील कोळी वाड्यात धिरज शिंदे याने दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर नसीर बशीर पटेल रा. साकेगाव या दूधव्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने यात नसीर पटेलचा जागीच मृत्यु झाला .
दरम्यान फरार झालेल्यां संशयीत आरोपीचा पोलीस शोध घेत होते .मंगळवारी रात्री आरोपी शिंदे बाजारपेठ पोलीसांना शरण आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे .
खून करून फरार झालेला संशयित आरोपी धिरज गणेश शिंदे हा दिनांक ३ मार्च २०२० रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनला स्वत: हजर झाला. पुढील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी करीत आहेत.



