यावल - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खु तालुका यावल येथे नुकतेच नशामुक्त कुटुंब - नशामुक्त भारत या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. भारत सरकारच्या नशामुक्त अभियान उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शालेय विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रबोधन व्हावे या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे जळगाव जिल्हा संघटक डॉ दयाघन राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते श्री.मयुर महाजन यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाप्रसंगी उपशिक्षिका सौ.जयश्री काळवीट मॅडम यांनी प्रमुख वक्ते डॉ.दयाघन राणे यांचा परिचय करून दिला. मयूर महाजन यांचा सत्कार उपशिक्षिका रंजना सोनवणे मॅडम यांनी केला
सांगवी खुर्द गावचे शिक्षणप्रेमी नागरिक श्री.दिगंबर कोळी यांनी पुष्प गुच्छ देऊन प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले.
डॉ.दयाघन राणे यांनी विविध पोस्टर्स च्या माध्यमातून लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत,संवादात्मक स्वरूपात खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना दारू,सिगारेट, तंबाखू या व्यसनांबाबत माहिती दिली.
व्याख्यानानंतर सर्व विद्यार्थी व उपस्थितांना व्यसनमुक्त भारत ची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला अंगणवाडी ताई अरुणा तायडे,शाळेच्या उपाध्यक्षा काजल वाघ,निशा अडकमोल,वैशाली कोळी,वंदना पाटील,अंगणवाडी मदतनीस सिंधुताई पाटील व पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका श्रीमती रंजना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नंतर सर्वांचे आभार मानले.