भुसावळ – भोरगांव लेवा पंचायत ठाया संपन्न पाडळसे, शाखा भुसावळ तर्फे संतोषी माता हाॅल येथे आज दिनांक ३१ मार्च रोजी विधवा, विधुर ,घटस्फोटीत, शेतकरी, प्रौढ, यांचा १२वा वधुवर मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात पुणे, वापी, सुरत, छत्रपती संभाजी नगर, मलकापूर, व विदर्भातील मुलमुली व पालक हजर होते.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी भोरगांव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील यांनी समाजहितासाठी आम्ही मेळावा घेत असतो त्याचा नक्कीच फायदा होत असतो. तसेच लेवा समाजातील करोना काळात जन्म झालेल्या मुलींचे लग्न व शिक्षणाचा खर्च भोरगांव लेवा पंचायत तर्फे करण्यात येणार असल्याचे, प्रस्ताविकात जाहिर केले.
यावेळी छत्रपती संभाजी नगरहून आलेले उद्योगपती वसंत पाटील यांचा लेवा उद्योग रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे वाचन मंगला पाटील यांनी केले.
उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी कार्यक्रमासंबधी उपस्थितांना माहिती दिली व आता पर्यंत या वर्षी १६ मुलींचे समुपदेशन करून संसार सुरळीत केले. आता पर्यन्त ७६ मुली नांदायला गेल्या हे भुसावळ शाखेचे वैशिष्ट्य आहे.
घटस्फोटाचे प्रमाण पाहता एकचतुर्थांश मुली नांदायला गेल्या. ही समुपदेशन कक्षा ची जमेची बाजू असल्याचे सांगितले.
या मेळाव्यात ४० मुले व १५ मुली यांनी परिचय दिला.
. व. पू. होले कथाकार यांनी मनोगत व्यक्त करून आजच्या युवक युवतींनीना मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित पाटील, प्रमुख पाहुणे वसंत पाटील,मधुकर सरोदे, अँड. प्रकाश पाटील, परिक्षित ब-हाटे, आर. जी चौधरी शरद फेगडे,डिगंबर महाजन उपक्रम चेअरमन आरती चौधरी, मंगला पाटील, स्वाती भोळे उपस्थित होत्या .
जळगाव भोरगांव पंचायत चे सदस्य अशोक चौधरी व यादवराव ब-हाटे, उल्हास पाटील, शाम भारंबे, मनोज जावळे, रूपेश चौधरी, अर्चना पाटील, शालीनी पाटील, चारूलता पाटील हजर होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. बाळू पाटील यांनी केले. आभार स्वाती भोळे यांनी मानले.



