महाराष्ट्र लैक्राँस असोसिएशनची कार्यकारणीची घोषणा : अध्यक्षपदी डॉक्टर सुमेधा ठाकूर तर सचिव पदि डॉक्टर मो. बाबर :

भुसावळ:- महाराष्ट्र लैक्रोस असोसिएशनची कार्यकारणीची गठन नागपूर येथील सीताबर्डी कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले. यात सर्व संमतीने डॉक्टर सुमेधा ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदी डॉ. मो बाबर यांची निवड करण्यात आली .

२०२८ मध्ये अमेरिका येथील लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळामध्ये लैक्रोस खेळाचा समावेश असून त्या अनुषंगाने देशासह राज्यातील मुलांना ऑलिंपिक खेळात भाग घेण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली व त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे.
कार्यकारिणी अशी
डॉ. सुमेधा ठाकूर (अध्यक्ष), डॉ मो. बाबर (सचिव), डॉ. सायमा सिद्दिकी (कोषाध्यक्ष), डॉ. बाबुलाल धोत्रे व राजकुमार कैथवास (उपाध्यक्ष) निखिल राऊत, वासेफ पटेल (सहसचिव) सदस्यांमध्ये सलीम फारुकी व इतर सदस्यांचा समावेश आहे ही कार्यकारणी पुढील पाच वर्षापर्यंत संघटनेचा कामकाज पाहणार असून या सभेमध्ये ३० पेक्षा जास्त सदस्य उपस्थित होते