भुसावळातील गोसेवक रोहित महालें यांच्या मदतीने वाचले तरुणीचे प्राण ;

भुसावळ – येथील धडाडीचे व सदैव कार्यतत्पर असणारे गो सेवक रोहित महाले यांनी एका कुटुंबियांना तात्काळ मदत करून मुत्युच्या दारात सापडलेल्या त्यांच्या मुलीस वेळेवर दवाखान्यात नेऊन मुलीचा जिव वाचवण्याचे महत्वपूर्ण काम करून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी आचरणात आणून महत्वपूर्ण व कौतुकास्पद भूमिका निभावली .या कार्याबद्दल सर्वत्र महाले यांचे कौतुक होत आहे

भालोद येथील नितीन कोळी हे त्यांची पुतणी प्रिंयका विनोद कोळी हिस श्वास घेण्यात अडचण येत असल्याने उपचारासाठी भुसावळातील भोळे हास्पीटललां घेऊन आले असता दवाखाना शोधण्यासाठी त्यांना अडचण येत होती दरम्यान त्याचवेळी तेथून गोसेवक रोहित महाले महाराजांच्या दर्शनासाठी पायी जात होते

यावेळी थाबलेली रिक्षा व रिक्षा मधील तरुणीला अत्यंत त्रास होत असल्याचे पाहून त्यांनी विचारले काका रिक्षा का थांबविली आहे त्या ताईना अस्वस्थ वाटतंय तब्बेत सिरीयस दिसते यावर त्यांनी भोळे हास्पीटल विचारताच महाले यांनी क्षणाचाही विलंब न करता दवाखाना विचारत अगदी जलद गतीने उपचारासाठी दवाखान्यात आणले . व डॉ सुरज भोळेची भेट घेतली परिस्थिती गंभीर असल्याने आय सी यु मध्ये भरती करावे लागणार असल्याने मोठा खर्च लागणार होता परिस्थितीत बेताची असल्याने कोळी परिवार अडचणीत आला तेव्हा मुलीला वडील नाही आई मोल मजुरी करते माहीत झाले रोहित महाले यांनी तत्परता दाखवत मा . खासदार रक्षाताई खडसे व समाजसेवक योगेश पाटील ह्यांना कळविले . सर्वांचे सहकार्याने वेळेवर भरती केल्याने तरुणीचे प्राण वाचले‌ डॉक्टरांनी धोका टळल्याचे सांगताच मुलीच्या आईच्या डोळ्यात पाणी आले व त्यांनी महाले यांना पाहत मी आज देवाला भेटले असे उद्गार काढले. यावेळी

आशा कोळी स्नेहा कोळी ,संतोष कोळी ,,सुनील कोळी , आशा विनोद कोळी नी आभार मानले व आजपासून माझा दुसरा मुलगा असल्याचे म्हणत गौरवोद्गार काढले

मी माझे कर्तव्य व जबाबदारी सांभाळली , या पवित्र कामात गोमाता मला मदत करते माणुसकी म्हणुन प्रत्येकाला अपघाता पासुन , संकटात सापडलेल्या ना वाचवा आपली एक मदत कोणाला तरी जीवदान देते अडचणीत असणाऱ्याना सहकार्य व मदत करा असे आवाहन गोसेवक रोहित महालेनीं यावेळी केले