होळी विशेष – २ अतिरिक्त अनारक्षित गाड्या धावणार :

मध्य रेल्वेने यापूर्वी १२८ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. पुढील दिलेल्या तपशिलांनुसार सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन २ अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पटना- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित विशेष (२ फेऱ्या)

01151 अनारक्षित विशेष दि. २३.०३.२०२४ (शनिवार) रोजी ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पटना येथे पोहोचेल. (१ फेरी)

01152 अनारक्षित विशेष गाडी दि. २४.०३.२०२४ (रविवार) रोजी पटना येथून १७.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे: दादर, कल्याण, मनमेल, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज छिवकी, बक्सर आणि आरा.

संरचना: २२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह.

या विशेष ट्रेनच्या सविस्तर थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry ला भेट द्या. Indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.