भुसावळ विभागात विशेष तिकिट अभियान : विनातिकीट प्रवाश्यांविरुद्ध कारवाई : ५ लाख १३ हजाराचा दंड वसूल :



भुसावळ – भुसावळ विभाग विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करण्यात येते यामुळे सर्व रेल्वे वापरकर्त्यांना सुखकर प्रवास आणि उत्तम सेवा मिळावी. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याअभियांनातर्गत आज
दिनांक २२.०३.२०२४ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली.

हि मोहीम विभागातील भुसावळ ,मनमाड, नाशिक, खंडवा ,बडनेरा ,अकोला ,जळगाव, बुऱ्हानपूर ,चाळीसगाव, मलकापूर, शेगाव या स्थानकावर विशेष टिकीट अभियान चे आयोजन करण्यात आले होते. या अभियान मध्ये सहाय्यक वाणिज्य प्रबंधक ,मुख्य वाणिज्य निरीक्षक ,वाणिज्य पर्यवेक्षक , तिकीट तपासणीस आणि आरपीएफ कर्मचारी यांच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात आले.
सहाय्यक वाणिज्य प्रबंधक तिकीट चेकिंग रत्नाकर शिरसागर भुसावळ येथे, सहायक वाणिज्य प्रबंधक कोचिंग अनिल बागले खंडवा स्टेशन येथे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक गुड्स नन्नवरे मनमाड स्टेशन येथे विशेष टिकीट अभियान मध्ये सहभागी होते.

दिनांक २२.०३.२०२४ रोजी भुसावळ विभागात सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ८९० प्रकरणांतून रु. ५ लाख ८ हजार दंड वसूल करण्यात आला.यामधे ०३ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. धुम्रपान करणारे ४० प्रकरणातून ४८०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. असा एकूण ९३० प्रकरणांतून रू ५ लाख १३ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.