भुसावळ – वरणगाव शिवसेना शहरप्रमुख पदाची यशस्वी जबाबदारी सांभाळनारे संतोष माळी (आपला माणूस) यांची भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख पदाची नियुक्ती करून नवीन जबाबदारीची घोषणा सोमवार दि. १८ मार्च रोजी भुसावळ येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे.

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेवरून उत्तर महाराष्ट्राचे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. आगामी काळात भुसावळ विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद आणि पक्ष संघटना मजबूत करून गाव तेथे शाखा हा अजेंडा राबविला जाणार असल्याची माहिती संतोष माळी यांनी दिली आहे.
संतोष माळी यांची भुसावळ तालुका विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी तसेच शिवबा मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आपला माणूस मित्र परिवार वरणगाव यांच्याकडून संतोष माळी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.


