भुसावळ – भुसावळ विभागातर्फे 15 ते 17 मार्च या कालावधीत भारत स्काउट्स अँड गाईड्सचा 3 दिवसीय 15 वा जिल्हा मेळावा आणि 13 व्या रेंजर्स अँड रोव्हर्स शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्धघाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी केले. या शिबीर मध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विविध खेळ, क्रिकेट स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, संगीत, रन चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 3 विविध शाळांतील एकूण 200 स्काउट आणि गाईड सहभागी झाले होते.
अनेक खेळ, नृत्य आणि संगीत स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्यांना पारितोषिक विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते देण्यात आले. आठ वेगवेगळ्या प्रकारचे साहसी उपक्रम स्टार आकर्षण होते. या शिबीर मध्ये अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम के मीना, इतर अधिकारी आणि स्काउट आणि गाईड चे सदस्य सहभागी होते.







