नाहाटा महाविद्यालयात NEP 2020 या विषयावर चर्चासत्र संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – कला, विज्ञान व पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात NEP 2020 : Theme and Prospects या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस. व्ही. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, कबचौ उमवि ,जळगाव हे होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. जगदीश पाटील, अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा, कबचौ उमवि, जळगांव हे लाभले. तसेच सिनेट सदस्य प्रा. इ. जी.नेहेते, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, समन्वयक डॉ.उमेश फेगडे आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सकाळी ठीक 10 वा. डॉ विनोद पाटील, कुलसचिव, कबचौ उमवि यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, कबचौ उमवि, जळगांव यांनी NEP 2020 बदल शासनाच्या भूमिकेबरोबर विद्यापीठाची भूमिका मांडली आपल्या विद्यापीठात शासनाने दिलेल्या गाईडलाईननुसार कार्य चालू आहे . त्यानुसार क्रेडिट आणि कोर्स यांच्या जोडणीचे काम जवळजवळ संपलेले असून कार्यभारावर ( तासिका ) त्यांनी प्रकाश टाकला . कार्यभागाची देखील काळजी विद्यापीठाने घेतली आहे .
त्यानंतर या चर्चासत्राचे मार्गदर्शक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले की, बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. त्यानुसार उच्च शिक्षणातही कसे बदल होत गेले याचा आढावा घेतला. त्यांनी NEP 2020 बदल PPT द्वारे त्यातील बारकाव्यांचा तपशीलवार विचार मांडले. त्यात लोकल टु ग्लोबल , प्रोजेक्ट , इटर्नशिप बदलही माहिती दिली . तसेच त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेबदल ही आपले विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शना नंतर प्रश्न उत्तर रूपी संवाद साधला .महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 20 20 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत परिसरातील संपूर्ण महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .
या चर्चासत्रामध्ये जळगाव जिल्ह्यातील, परिसरातील 18 महाविद्यालयातील 340 प्राध्यापक , प्राध्यापिका उपस्थित होते.या चर्चासत्राचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. ममता पाटील यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. बी एच. बऱ्हाटे यांनी केले. आभार डॉ. उमेश फेगडे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. हर्षल पाटील, डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. संगीता भिरूड, प्रा. डॉ .नीलिमा पाटील, डॉ. मनोज जाधव ,डॉ विलास महिरे , प्रा.पूनम महाजन, डॉ. सचिन कोलते, प्रा. एकता बजाज, प्रा. दिगंबर महाजन, प्रा. अर्चना भालेराव आणि कार्यालयीन अधिक्षक भगवान तायडे आदीनी परिश्रम घेतले.