चाळीसगाव:
चाळीसगांव शहरातील तिरंगा पुलावरुन, अवैध रित्या प्रतिबंधीत विमल गुटखा विक्री कामी, एका वाहनातून जाणार असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने, . डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक यांचे तसेच अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर व सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी पोलीस उप निरीक्षक, योगेश माळी, पोहेकॉ/पंढरीनाथ पवार, पोना/भुषण पाटील, भटु पाटील, पोकॉ/विजय पाटील, मनोज चव्हाण अशांना बातमीची खात्री करून, कायदेशीर कारवाई करा असे आदेशीत करुन रवाना केले होते. त्यावरून वरील नमूद पोलीस स्टाफ तिरंगा पूल या ठिकाणी जावून, पोलीसांनी तिरंगा पुलावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली असता दिनांक 13/03/2024 रोजी रात्री 10.15 वाजता एक इको वाहन क्रमांक MH 19 EA 3958 हिची तपासणी केली असता, सदर वाहनात एकूण लहान मोठया अशा 18 गोण्या दिसून आल्याने सदर गोणीमध्ये काय माल आहे बाबत वाहन चालकास विचारले असता, तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने पोलीसांचा संशय बळावल्याने, पोलीसांनी वाहनात ठेवलेल्या गोण्यांची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला विमल (गुटखा) पान मसाला व सुगंधीत तंबाखु असल्याचे आढळुन आले. वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अक्षय गुलाब कोतकर वय 24 वर्षे, रा. गुरूवर्य नगर, तिरंगा पूलजवळ, चाळीसगांव असे असल्याचे सांगितले. वाहन चालकास वर नमुद मुद्देमाल व वाहनासह पोलीस स्टेशनला आणुन, जप्ती पंचनामा करणेकामी सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव यांना कळविल्याने त्यांनी पोलीसांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन,

संशयीत आरोपी अक्षय गुलाब कोतकर याचे ताब्यात) विमल पान मसाला नावाचा गुटखा असलेले एकुण 05 गोण्या, 2) V-1 तंबाखु असलेले एकुण 05 गोण्या, , विमल पान मसाला नावाचा गुटखा असलेले एकुण 03 गोण्या, , V-1 तंबाखु असलेले एकुण 03 गोण्या, विमल पान मसाला नावाचा गुटखा असलेले एकुण 01 गोणी, V-1 बिग तंबाखु असलेले एकुण 01 गोणी, व एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीचे इको वाहन क्रमांक MH-19 EA-3958 असा एकुण 09,24,000/- रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला विमल (गुटखा) पान मसाला व सुगंधीत तंबाखु अवैधरित्या कब्जात बाळगतांना मिळून आला.
सदर मुद्देमाल हा जनहित व जन आरोग्याचे दृष्टीकोनातुन प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पानमसाला विना परवाना विक्रीच्या उद्देशाने स्वताचे कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन नमुद आरोपी विरुध्द पोकॉ विजय पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. 112/2024 भा.द.वि.कलम 328,188,272,273 सह अन्न व सुरक्षा अधिनियम मानके 2006 चे कलम 26(2)(iv),59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीतास अटक करुन सदरचा माल हा जप्त करण्यात आला आहे.
वरिल कार्यवाही . डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक यांचे तसेच अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर व सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, योगेश माळी, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोना भुषण पाटील, भटु पाटील, पोकॉ मनोज चव्हाण सर्व. चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनिरीक्षक योगेश माळी, पोना राकेश पाटील व पोकॉ कल्पेश पगारे नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.


