भुसावळ – भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा भागातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची नुकसानभरपाई मिळत नसल्याने भुसावळ तहसिल कार्यालयात (ता.१३) रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घेतला.

जळगांव जिल्ह्यात (२७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर) या कालावधीत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत काहूरखेडा गावातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक बारी यांची भेटी घेतली असता ऑनलाइन क्लेम करा तरच विमा मिळेल असे सांगितले. गावातील १५० शेतकऱ्यांनी पूर्ण माहिती पाठविली. यानंतर चक्क दोन महिने प्रतिनिधी आलेच नाही. अचानक २४ ते २५ जानेवारी रोजी प्रतिनिधी १५० शेतकऱ्यांची यादी घेवून प्रकट झाले व सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेतले. विमा प्रतिनिधी बारी यांची भेट घेतली असता तुमचे विमे रद्द झाले आहेत. पाऊस २७ नोव्हेंबरला झाला असून तुम्ही २८ नोव्हेंबरला विमा क्लेम केला आहे. मग १५० शेतकऱ्यांची यादी घेवून का आले? तुम्ही २७ नोव्हेंबरका विमा क्लेम केला असता तर नुकसानभरपाई मिळाली असती.एकीकडे प्रशासनाने (३१ नोव्हेंबर व १ डिसेंबर) रोजी चौदा शेतकऱ्यांचे विमा क्लेम मंजूर केले तर दुसरीकडे दुजाभाव करीत १५० शेतकऱ्यांचे विमा क्लेम नामंजूर केले. त्या शेतकऱ्यांनी तालुका तक्रार निवारण समिती तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. सात दिवसांच्या आत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून स्थानिक चौकशी करतील. तसेच तलाठी यांच्याकडून पंचनामे करून घेवून जिल्ह्याधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करतील. जिल्ह्याधिकारी सदरील अहवाल विमा कंपनीकडे पाठवल्यानंतर १४ दिवसांच्या आत पैसे देणे बंधनकारक आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेली शेतकऱ्यांनी आपले सातबारा उतारे अर्जासोबत जोडून तक्रार देण्याचे सांगितले.
नैसर्गिक अडचण आल्यास ७२ तासांची वेळ असते. नुकसान झाल्याचे फोटो सी.एस.सी. सेंटरवर जावून तीन दिवसांची वाट न पाहता दोन दिवसमध्येच लोड करा. यानंतर विमा कंपनीने क्लेम नामंजूर केल्यास जे शेतकरी यासाठी पात्र असेल त्यांनी तालुका तक्रार निवारण समिती तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा अशी माहिती जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.


