संबळपूर ते पुणे दरम्यान विशेष ट्रेन सेवा (०३ फेरी)


भुसावळ –
सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे:
विवरण पुढीलप्रमाणे –
गाडी क्रमांक ०८३२७ संबळपूर – पुणे विशेष दिनांक १७.०३.२०२४ ते ३१.०३.२०२४ पर्यंत प्रत्येक रविवारी संबळपूर येथून २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुणे येथे ०२.४५ वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक ०८३२८ पुणे – संबळपूर विशेष दिनांक १९.०३.२०२४ ते ०२.०४.२०२४ पर्यंत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संबळपूर येथे १३.३० वाजता पोहचेल.
थांबे -:बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राज नांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणीसह २ गार्ड्स ब्रेक व्हॅन (२२ डब्बे)
या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे