भुसावळ –
युवती कल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त दि. 14 मार्च 2024 रोजी भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. स्मिता मोहन फालक व मा. सौ. कल्पना महेश फालक यांच्या हस्ते, मा. प्राचार्य डॉ. एस व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी, युवती कल्याण समिती चेअरमन प्रा. डॉ. गौरी एम. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी महिला उद्योजिका, महिलांसाठीच्या विविध शासकीय योजना, समाज निर्मितीमध्ये महिलांचे योगदान, समाज माध्यमेआणि वाढती गुन्हेगारी, आर्थिक नियोजनामध्ये महिलांचा सहभाग, महिलांचे आरोग्य आणि जागरूकता अशा विविध विषयांवर माहिती प्राप्त झाली.
या स्पर्धेसाठी फक्त विद्यार्थिनीच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा हिरीरीने सहभागी झाले. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सायली सतीश पाटील, द्वितीय क्रमांक कु. खुशबू सरफराज तडवी व तृतीय क्रमांक कु. वैष्णवी सुभाष महाले यांनी पटकावला. तसेच निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. तृष्णा मिलिंद भैसे, द्वितीय क्रमांक कु. निकिता समाधान चौधरी व तृतीय क्रमांक कु. कामिनी देवानंद शिंदे यांनी मिळवला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. डॉ. स्वाती महाजन व प्रा. वंदना महाजन यांनी केले.
स्पर्धेचे नियोजन व आयोजन साठी युवती कल्याण समिती सदस्य प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. विद्या पाटील, प्रा. डॉ. स्वाती फालक, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. संगीता भिरुड, व प्रा. पूनम महाजन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅपशन—-पोस्टर प्रेझेंटेशन विद्यार्थिनी सोबत सौ स्मिता फालक, सौ कल्पना फालक यांच्या समवेत महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका वर्ग


