धरणगाव तालुक्यातील महिलेच्या पर्समधून दागिण्यांसह रोकड व मोबाईल लांबवले :


धरणगाव : कार्यक्रमासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून भामट्यांनी दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून 18 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल लांबवला याप्रकरणी मंगळवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धरणगाव तालुक्यातील हॉटेल सुगोकी लॉन्समध्ये हा प्रकार घडला.
उर्मिला प्रमोद ठाकूर (52, रा.सिध्दी विनायक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) पाळधी येथील सुगोकी लॉन येथे एका कार्यक्रमासाठी सोमवार, 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता आल्या असता चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 18 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. मंगळवार, 12 मार्च रोजी दुपारी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विठ्ठल पाटील करीत आहे.