निरोगी जीवनासाठी निसर्गपूरक जीवनशैली अवलंबवावी- सौ आरती चौधरी!

भुसावळ – येथील श्री गुरुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक सभेत ” जागतिक महिला दिना ” निमित्त सक्षम कॉन्सेलिंग सेंटरच्या संचालिका आरती चौधरी यांचे व्याख्यान आयोजित केले होते . आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सभेच्या अध्यक्षा, सचिव, कोषाध्यक्षा सुत्रसंचालन, आभार प्रदर्शन सर्व जबाबदाऱ्या आज सर्व महिलांनीच पार पाडल्या . आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ आरती चौधरी यांनी त्याच्या समुपदेशनाच्या कार्यातील आलेल्या अनुभवाचा संदर्भ देत महिलांना मौलीक मार्गदर्शन केले .

महिलांनी आत्मविश्वास बाळगावा, आपल्या इच्छा कोणत्याही वयात पूर्ण करण्याची तयारी ठेवावी , इच्छाशक्ती जागरूक ठेवावी, स्वतःसाठी वेळ द्यावा व स्वच्छंदी रहावे म्हणजे आपले आरोग्य चांगले राहील . निसर्गाने आपल्याला जे दिलेले आहे ते हसत स्वीकारावे . परमेश्वराने महिलांना ” मातृत्वाची” देणगी दिली आहे त्या कर्तृत्वात कुठेच कमी पडत नाही . आरतीताईनी महिलाना मानसीक बळ दिले . प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने व अभिमानाने बघण्याचा सल्ला दिला . खूप सुंदर मार्गदर्शन करून समुपदेशन ही केले . आरती चौधरी व त्यांच्या सहकारी मैत्रीणीनी संघातील सर्वमहिलांना भेट वस्तू देऊन सन्मान केला . महिला क्रिडा मंडळच्या सचिव लता होसकोटे, जयश्री ओक, भारती चव्हाण, राजश्री कात्यायनी हजर होते . गुरुदेव जेष्ठ नागरिक संघातर्फ सर्व उपस्थित महिलांचे रुमाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले . अध्यक्षीय भाषण सुशीला पाटील यांनी केले तर सचिव साधना हरिमकर यांनी सुत्रसंचालन केले . पाहुण्याचा परिचय निर्मला पाटील यांनी केला . यावेळी जयश्री विसपुते यांनी कोषाध्यक्ष पद सांभाळले . शोभा जावळे यांनी आभार प्रदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश विसपुते, महादेव हरिमकर, प्रकाश तायडे, एन के पाटील, रमाकांत पाटील, रामकृष्ण पाटील, प्रा . बी डी चोधरी, दिनकर जावळे, भानूदास येवले व इतर सभासदांनी सहकार्य केले . अशा प्रकारे आगळावेगळा महिला दिन साजरा करण्यात आला . पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली