नाहाटा महाविद्यालयात भारतीय ज्ञानपद्धती या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन .

भुसावळ -येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखे तर्फे दिनांक .15 मार्च शुक्रवार रोजी ‘भारतीय ज्ञान पद्धती ‘ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ एस व्ही पाटील यांनी कळविले आहे .

नाहाटा महाविद्यालयातील मानव्य विद्या शाखेतर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ मोहन फालक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक , सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्य डॉ एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ बी एच ब ऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी हे प्रमुख पाहुणे असतील .तर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा डॉ आशुतोष पाटील हे ‘भारतीय ज्ञान पद्धती ‘ या विषयावर मार्गदर्शन करतील .

सदर परिषदेत जळगाव,नंदुरबार, धुळे तसेच राज्यातील इतर ठिकाणाहुन शोध निबंध पाठविण्यात आले आहे . प्रोफेसर, सहयोगी प्राध्यापक ,सहायक प्राध्यापक, संशोधक उपस्थित राहतील . मानव्य विद्या शाखेतील प्राध्यापकांचे योगदान लाभत असल्याचे प्राचार्य डॉ एस व्ही पाटील यांनी कळविले आहे .