पारोळा —
पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा भागातील
नम्रता फासगे या विद्यार्थिनीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा भागातील रहिवासी
नम्रता भास्कर फासगे वय १६ या तरूणीने
रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी
पारोळा येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. सध्या ती परीक्षा देत होती. या युवतीने घरात ओढनीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
कोणालाच काहीही न सांगता आपल्या घरातील लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास तयार करून आत्महत्या केली.
परिसरात ही घटना कळताच तिला खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका निरमुळे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.



