भुसावळ (प्रतिनिधी )-
हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शम्मी प्रल्हाद चावरीया (30, रा.अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ) तसेच बंटी परशुराम पथरोड (33, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) व विष्णू परशुराम पथरोड (22, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) यांना शुक्रवारी मध्यरात्री कोम्बिंग दरम्यान अटक करण्यात आली होती.
अटकेतील तिघा आरोपींना शनिवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता आरोपी शम्मी चावरीया याची पी.आर.बॉण्डवर सुटका करण्यात आली, तर बंटी व विष्णु पथरोड या दोघावर हद्दपारी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.



