जळगाव : बारावी बोर्ड परिक्षा सुरू असून येत्या दि.3 मार्च पासून दहावीच्या परिक्षेस प्रारंभ होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून 64 हजार 70 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले असून 134 केंद्रावर ही परिंक्षा होणार आहे. यात 20 परिक्षा केंद्र उपद्रवी असल्याने या केंद्रावर पथकांची करडी नजर असणार आहे.
दहावीच्या परीक्षांना 3 मार्चपासून इंग्रजीच्या पेपरने सुरूवात होणार आहे. नाशिक मंडळातून 2 लाख 16 हजार 444 विद्याार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ आहे. केंद्रावर कॉपीचा वापर होत असल्याने या परीक्षेसाठी देखील प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक असणार आहे. तर जिल्हास्तरावरून 6 पथक तैनात करण्यात आले आहे.जिल्ह्यातून 134 केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून तयारी पुर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्यात 20 केंद्र उपद्रवी असल्याने या केंद्रावर बंदोबस्त ठेवला जाणार आहे.या केंद्रावर विषेश नजर असणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.



