भुसावळातील चोरीचा उलगडा : आरोपीस अटक

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील गवळीवाड्यात कुटुंब 19 ते 20 फेब्रुवारीदरम्यान लग्नाला गेल्याने चोरट्याने संधी साधुन 20 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते . या प्रकरणी मो.शोहेब मो.सादीक यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती .
दरम्यान या चोरीचा उलगडा करण्यात भुसावळ शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले असून मुक्तार इमाम गवळी (25 ) रा . गवळीवाडा भुसावळ यास अटक करण्यात आली आहे.
मो.सादीक यांच्या घरातून एटीएम सुद्धा लांबवले होते चोरट्याने रक्कम काढण्यासाठी एटीएम चा वापर केल्याने तो अलगद पोलिसांच्या जाळयात अडकला. आरोपीने ज्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेथून सीसीटीव्ही फुटेज मिळवल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक करण्यात यश आले. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली 20 हजारांची रोकड व 20 हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यकन फौजदार संजय कंखरे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख मोहम्मद वली सैय्यद, समाधान पाटील आदींच्या पथकाने केली . तपास सहाय्यक फौजदार संजय कखरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *