भुसावळात पल्सर पेटली : सुदैवाने तरुणाचे वाचले प्राण –

भुसावळात पल्सर पेटली : सुदैवाने तरुणाचे वाचले प्राण –

भुसावळ : गोजोरा येथील तरुणाची दुचाकी भुसावळात कामाला आल्यानंतर पेटल्याची धक्कादायक घटना गुरुवार. 7 रोजी सकाळी 9.15 वाजता सरकारी गोदामाजवळ घडली. यावेळी सुदैवाने तरुण गाडीपासून दूर गेल्याने तरुणाचे प्राण वाचले.

अचानक पेटली दुचाकी
गुरूवारी सकाळी 9.15 वाजता तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी असलेला योगेश अशोक सोनवणे हा तरुण तापी नगरात कामाला जात असताना यावल रोडवरील गोदामाजवळ गाडीतून धूर निघू लागल्याने तरुणाने वाहन थांबवले व धूराची पाहणी करीत असताना बजाज पल्सर (एम.एच.14 एफ.ए.7176) पेटली. यावेळी तरुणाने रस्त्याच्या कडेला धाव घेतली तर यावेळी दुचाकीने पेट घेतल्यानंत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली तर नागरीकांची गर्दी वाढली. शहर पोलीस ठाण्याचे हवालदार सुपडा पाटील व संजय ढाकणे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या बंबाला पाचारण करण्यात आले.