भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग,कला व विज्ञान महाविद्यालय भालोद युवती सभेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप समारंभ पार पडला .या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पाटील जळगाव जिल्हा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे लाभलेले होते. त्यांनी मुलींना शुभेच्छा दिल्यात व भावी आयुष्यात खूप यशस्वी व्हा व स्वतःचे, कॉलेजचे व देशाचे नाव मोठे करा विद्यापीठामार्फत विद्यार्थी विकास विभाग असे कार्यक्रम तुमच्या चांगल्या भविष्यासाठीच राबवित असते व तुम्ही त्याचा योग्य वापर करा व स्वतःची प्रगती करून घ्या असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभाप्रमुख प्रा. मोहिनी तायडे यांनी केले त्यांनी सरांना आश्वासन दिले की,आमच्या विद्यार्थिनी नक्कीच हे सहा दिवसीय आत्मनिर्भय अभियानाचा चांगला वापर करून आत्मनिर्भर होतील व जगात आपले नाव यशस्वी करतील. प्रसंगी कु. वर्षा जावळे व कामिनी भालेराव या विद्यार्थिनींनी संपूर्ण सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानाचा आढावा प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण करून दिला.
कु. साक्षी चौधरी व कु.मोहिनी सणनसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे होते. अध्यक्षीय मनोगतात सरांनी मुलींना तुम्ही भावी पिढी घडवणाऱ्या महिला आहात .जर तुम्ही चांगल्या शिकल्यात आत्मनिर्भर झाल्यात तुमच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात तर नक्कीच त्याचा तुम्हाला स्वतःला तसेच देशाला फायदा होईल तेव्हा तुम्ही व्यवस्थित शिकून मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्यात.

प्रसंगी डॉ. डी. एच. पाटील सर विद्यार्थी विकास अधिकारी युवती सभेचे सदस्य डॉ.जी. आर. चौधरी, डॉ. मिनाक्षी वाघुळदे,प्रा. के. एस. पाटील,प्रा. पद्माकर सावळे, प्रा. वसंतराव पवार, प्रा. राजेंद्र इंगळे,प्रा. फाल्गुनी राणे, प्रा.गीतांजली चौधरी, प्रा.भावना प्रजापती प्रा. शैलजा इंगळे, प्रा. हेमलता कोल्हे, प्रा. कोमल सावळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कु.यामिनी भालेराव हिने केले तर आभार कु.दिशा पाटील हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी,. दिलीप इंगळे, रुपम बेंडाळे,श्री. किशोर चौधरी, पंकज नेहेते , मुबारक तडवी ,. तुळशीराम पाटील,यांचे सहकार्य लाभले.


