भुसावळ (प्रतिनिधी ) –
मित्रास मारहाण करीत असल्याने मध्यस्थी करीत पोलीस स्टेशनला जावु असे बोलल्याचा समोरच्यास राग आल्याच्या कारणावरुन येथील
केंद्रीय विद्यालयाजवळ शनिवारी दुपारी तिघा विद्यार्थ्यासह अन्य पाच सहा मुलांनी एकास फ़ायटर व लाठयाकाठयांनी बेदम मारहाण करीत जखमी केल्याची घटना येथे घडली .
शहरातील केंद्रीय विद्यालयामध्ये सीबी.एस.सी.बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू असून शनिवारी दिनांक 29 रोजी हिन्दीचा पेपर सुटल्या नंतर 1.45 वाजे दरम्यान रोहन नरेंद्र पाटील (वय 16) रा. चक्रधर नगर ,भुसावळ हा त्याचा मित्र ओम चंद्रकांत चौधरी याचे बरोबर घरी जात असतांना आरोपी यश पवार , हेमंत, संकेत पुर्ण नावे माहीत नाही व त्यांचे सोबत 5/6 मुले (नाव गाव माहीत नाही.) सर्व रा.भसावळ.यांनी ओम चौधरी यास शिवीगाळ मारहाण करीत असतांना रोहन पाटील याने त्यास पोलीस स्टेशनला चल असे बोलल्याचे आरोपीतांना वाईट वाटले त्यावरुन आरोपी यश पवार , हेमंत, संकेत व त्यांचे सोबत 5/6 मुले यांनी रोहन पाटिल यांना लाथाबुक्यांनी ,फायटरने छातीवर ,पोटावर,तोंडावर,डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली व धमकी दिली म्हणुन रोहन पाटिल याने दिलेल्या फिर्यादिवरुन शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 2020 भादंवि.क. 143,324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



