अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गोसेवक रोहित महाले यांचा गोरक्षक म्हणून गौरव :


भुसावळ – अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे निस्वार्थी उत्कृष्ट गोसेवक म्हणुन रोहित महालेंना गोरक्षक म्हणून गौरविण्यात आले
येथील अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केलेला होता या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना देखील सन्मानीत करण्यात आले. त्यापैकी गोमाता व मुक्या जीवांची निस्वार्थी सेवा करणारे गोसेवक रोहित महालें यांचा गौरव करण्यात आला . श्री संत गजानन महाराज प्रकट दिनी आयोजित सत्कार सोहळयास भाजप शहर अध्यक्ष युवराज लोणारी , ताप्ती एज्युकेशनचे अध्यक्ष मोहन फालक , जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी , प्रा अनिल कोष्टी , सरकटे सर, यांचेसह मान्यवर उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांचे हस्ते महाले यांना प्रमाणपत्र देण्यात आले . प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना अंतर्नाद प्रतिष्ठानचे संदिप पाटील सर व सर्व पदाधिकारी यांचे महाले यांनी आभार मानत यापुढेही सत्यकाम व गोसेवेसाठी सदैव सेवेत राहणार असून समाजाने सुद्धा गोसेवेकरिता जागरूक व्हावे तसेच गोहत्या मुक्त हिन्दुस्थान व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य मानद पशु कल्याण अधिकारी म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले कर्तव्याशी एकनिष्ठ प्रामाणिक निस्वार्थी राहत सेवा करेल असेही मत महालेंनी यावेळी व्यक्त केले .